चला साजरी करू प्रेमाची दिवाळी | ३१ ऑक्टोबर २०२६
प्रसिद्ध दिनांक २८/१०/२०२६
चला साजरी करू प्रेमाची दिवाळी!
दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा आणि रोषणाईचा उत्सव नाही, तर आनंद वाटण्याचा, माणुसकी जपण्याचा आणि आपुलकीची नाती अधिक दृढ करण्याचा सण आहे.
याच भावनेतून जाणिव चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘चला साजरी करू प्रेमाची दिवाळी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घेणे, प्रेम आणि आपुलकीची भावना वृद्धिंगत करणे, हाच या उपक्रमाचा उद्देश आहे.
दिनांक: शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
चला, यंदाची दिवाळी केवळ आपल्या घरापुरती मर्यादित न ठेवता प्रेमाची, आपुलकीची आणि माणुसकीची दिवाळी साजरी करूया!
जाणिव चॅरिटेबल ट्रस्ट आनंद वाटूया, माणुसकी जपूया!