आमची कथा
जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट ही आदिवासी व वंचित घटकांतील मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी कार्यरत संस्था आहे.
‘शिक्षणाची गाडी आली’ या उपक्रमातून संस्था आदिवासी पाड्यांतील शाळांमध्ये बाल-कला व क्रीडा महोत्सव घेते, आणि ‘प्रेमाची दिवाळी’ या उपक्रमातून आदिवासी मुलांसोबत सण साजरा करते.
संस्थेच्या या कामाची दखल वृत्तपत्रांनी घेतली आहे. त्याची कात्रणे ‘प्रसिद्धी’ पानावर पाहता येतात.

दृष्टी
आदिवासी व वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाची ओढ लागावी आणि शिक्षणातून त्यांचे परिवर्तन व्हावे.
शिक्षणातून परिवर्तन, संस्कारातून उज्ज्वल भविष्य.

ध्येय
मुलांसाठी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबवणे, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य व सहाय्य देणे आणि शाळा, स्वयंसेवक व समाजाला या कामात जोडणे.
उद्दिष्टे
आदिवासी पाड्यांतील विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी आणि शिक्षणाचे महत्त्व समजावे यासाठी उपक्रम घेणे.
खेळ, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांतून मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे.
शैक्षणिक व खेळाचे साहित्य, खाऊ आणि भेटवस्तू देऊन गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य करणे.
सण आदिवासी मुलांसोबत साजरे करून आनंद वाटणे.
शैक्षणिक, सामाजिक आणि लोकोपयोगी उपक्रम दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने करणे.

विश्वस्त व पदाधिकारी
नोंदणी तपशील
Public Charitable Trust · No. F62324 · Charity Commissioner, Maharashtra